मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. अजितदादांकडे स्वतःचे ४० आमदार असून सहा मतांची तूट आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसची मतं फोडण्याचा विश्वास दादा गटातील नेते करत आहेत. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजितदादांचा उमेदवार पडण्याचे सूचक संकेत दिले आहेत. […]