मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी वर्तविण्यात आलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणात अवकाळीचा फारसा प्रभाव नसेल; तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या तीन विभागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानादिवशी, म्हणजे १३ मे रोजीही पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांची चक्रीय स्थिती मध्य महाराष्ट्र आणि […]