प्रतिनिधी, पुणे : एकाच शिक्षण संस्थेच्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा असतील, तर विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्याच संस्थेच्या अनुदानित शाळेत काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिल्यानंतर सरकारने निर्णय काढून शिक्षकांच्या अनुदानित पदांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवल्याचे जाहीर केले आहे. याचा फायदा राज्यातील विनाअनुदानित तत्त्वांवर काम करणाऱ्या अनेक शिक्षकांना होणार […]