पुणे: ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे सरकारी यंत्रणा, प्रशासनातील अधिकारी, राजकारणी, धनाढ्य यांचे हितसंबंध उघडकीस येऊ लागले आहेत. पोर्शे कार अपघातात दोघांचा जीव गेला. ती कार बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघात होताच स्थानिकांनी, पादचाऱ्यांनी आरोपीला पकडलं. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर स्थानिक आमदार सुनील टिंगरेंनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हेगाराला वाचवण्यासाठीच […]