मुंबई : लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याने आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून ते सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून राज्यात पेटलेल्या वातावरणाची झळ अधिवेशनाला बसण्याची चिन्हे आहेत.घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील निष्पाप नागरिकांचे मृत्यू, पुण्यातील पोर्श कार प्रकरण […]