मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना १ मार्चपासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार असून, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे […]