पुणे : सूर्यावरून उसळलेल्या भारित कणांच्या वादळांमुळे पृथ्वी नजीकच्या कक्षेतून फिरणाऱ्या भारताच्या काही उपग्रहांच्या कक्षेवर परिणाम झाल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) मंगळवारी दिली. सौर वादळामुळे पृथ्वी नजीकच्या कक्षेतून फिरणाऱ्या भारतीय उपग्रहांची कक्षा दैनंदिन सरासरीपेक्षा पाच ते सहा पटींनी आकुंचन पावली. मात्र, भारताचे सर्व उपग्रह सौरवादळाच्या धक्क्यातून बचावल्याचे इस्रोने नमूद केले आहे.सूर्यावरून १० आणि […]