मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठीचे उमेदवार जे. एम. अभ्यंकर हे भ्रष्ट आणि देशद्रोही असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे. कारगील युद्धातील हुतात्म्यांसाठी राखीव असणाऱ्या आदर्श सोसायटीत खोटी कागदपत्रे आणि कमी वेतन दाखवून फ्लॅट लाटणाऱ्या जे. एम. अभ्यंकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. शिक्षण संचालकपदावर असताना शिक्षकविरोधी […]