शिरुर : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन शिलेदारांमध्ये लढत झाली. मागच्या निवडणुकीतील डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील याच प्रमुख दोन उमेदवारांमध्ये बदललेल्या चिन्हांवर लढत झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी बारामतीनंतर शिरूरची लढाई प्रतिष्ठेची झाली. जिल्ह्यातील दुसरी जागा राखण्याचे आव्हान अजितदादांपुढे निर्माण झाले असताना आढळरावांच्या राजकीय भविष्याचा फैसला ही निवडणूक करणार […]