मुंबई : ‘देशाला विकसनशील भारताकडून विकसित भारत या दर्जाकडे न्यायचे असेल तर ते स्वयंचलित पद्धतीने किंवा ऑटोपायलट मोडवर होणार नाही. आर्थिक प्रगतीचा वेग वाढवणे त्यासाठी गरजेचे आहे. म्हणूनच देशात वस्तूनिर्मितीला (मॅन्युफॅक्चरिंग) महत्त्व द्यावेच लागेल,’ अशी स्पष्टोक्ती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी केली. विकसित भारताची संकल्पना स्पष्ट करताना ते राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) प्रांगणात […]