प्रतिनिधी, पुणे : शहरातील विविध भागांमध्ये गुरुवारी दिवसभरात घरफोडीच्या चार घटना उघडकीस आल्या असून, साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव बुद्रुक येथील घरफोडीत ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी शिवसिद्धी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने […]