प्रतिनिधी, पुणे : रिक्षाचालकांच्या विरोधातील तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत अरेरावी करणे आदी तक्रारींचा समावेश आहे. रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रार करण्याची पद्धत सोपी नसल्यामुळे ‘प्रादेशिक परिवहन विभागा’कडे (आरटीओ) एखादीच तक्रार येते. या पार्श्वभूमीवर मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारीसाठी ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांक सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात […]