Posted inपुणे

भाईंच्या शिलेदाराने शड्डू ठोकला, ३ जागांवर दावा सांगितला, भाजपसहित दादांचं टेन्शन वाढलं

आदित्य भवार, पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीलमधील मित्रपक्षांनी राज्यातल्या विधानसभेच्या जागांवर दावा करायला सुरुवात केली आहे. अशातच पुणे शहरातल्या विधानसभेच्या ८ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाने ३ जागांवर आपला दावा केला आहे. त्यादृष्टीने शिवसेनेची तयारीही सुरू आहे, अशी माहिती स्वत: शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली आहे. […]