प्रतिनिधी, पुणे : शहरासह उपनगरांमध्ये दुपारनंतर पडलेल्या मुसळधार आणि वादळी पावसाने पुण्याला झोडपले. सलग दोन-अडीच तास पडलेल्या पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले, तर अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही पाणी शिरले. वडगाव शेरी भागात रात्री साडेआठपर्यंत १११ मिलीमीटर आणि कात्रजमध्ये ११३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. सकाळपासूनच उकाडा शहरात […]