Posted inमुंबई

पोर्शे कार अपघात : पुणे पोलीस आयुक्तांवर कारवाईची गरज नाही, फडणवीस यांचे उत्तर

प्रतिनिधी, मुंबई : पुणे येथील कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर झालेल्या अपघातात पुणे पोलिस आयुक्तांनी सक्रियतेने कार्यवाही केली असून त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, ज्या पोलिस आणि डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. […]