म. टा. वृत्तसेवा, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावाजवळील एकलहरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने भरधाव वेगात कार चालवून दुचाकीस्वार तरुणाला उडवले. यात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सहप्रवासी जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातानंतर आणखी एका अपघाताच्या घटनेची राज्यभर चर्चा सुरू झाली […]