प्रतिनिधी, पुणे : शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) ते स्वारगेट हा ३.६ किलोमीटर मेट्रोचा भुयारी मार्ग ऑगस्टमध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन भुयारी मेट्रो स्थानके सुरू केली जातील. त्यानंतर तिसरे मेट्रो स्थानक सुरू केले जाईल,’ अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रस्तावित […]