प्रतिनिधी, पुणे : कणीक मळण्याचे काम करत असताना बारामती येथील एका २२ वर्षीय तरुणाचा हात यंत्रामध्ये अडकला आणि अवघ्या काही क्षणातच मनगटापासून वेगळा होऊन जमिनीवर पडला. हा भयानक प्रकार पाहून या तरुणाच्या कुटुंबीयांचे सारे अवसान गळाले. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सात तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मनगटापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडण्यात यश आले. शस्त्रक्रियेच्या पंधरा दिवसानंतर […]