म.टा.प्रतिनिधी, पुणे: मुंबई वगळता पुण्यासह अन्य महापालिकांच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना करण्याच्या हालचालींना पुढील आठवड्यात वेग येण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा उद्या, सोमवारी (२० मे) पूर्ण होत आहे. राज्यातील निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर महापालिका निवडणुकांच्या प्रभागरचना अंतिम करण्याच्या हालचालींना वेग येईल, असा दावा सूत्रांनी केला आहे.राज्यातील २७ महापालिकांच्या सभागृहांची मुदत संपली असून, […]