पुणे : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. महायुतीमधून दोन उमेदवार तर महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमधील तीन तगडे उमेदवार पुण्यातील एकाच मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सांगली पॅटर्न होण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. महायुतीमध्ये रस्सीखेच […]