मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करत महायुती सरकारने वाहन चालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्यात आली आहेत. किती रुपयांचा दिलासा? […]