मुंबई : गर्भवती महिला व नवजात बाळांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांना आता यश येत आहे. मागील पाच वर्षांमध्ये मुंबईमध्ये मातामृत्यूंचे प्रमाण २२ टक्क्यांनी घटल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येत आहे. सन २०१९मध्ये जन्माला येणाऱ्या एक लाख बालकांमागे ८७ मातामृत्यूंची नोंद झाली होती. करोनाकाळामध्ये ही संख्या वाढून २०२०मध्ये ९१वर गेली. २०२१मध्ये त्यात […]