मुंबई : बुधवारी चेंबूर, देवनार भागामध्ये तुरळक पाऊस पडला. उर्वरित मुंबईमध्ये फारसा शिडकावाही नसल्याने शहराचे तापमान पुन्हा चढले. वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि पावसाचा अभाव यामुळे दिवसभर अस्वस्थ करणारी जाणीव मुंबईकरांमध्ये होती. कुलाबा येथे कमाल तापमानाचा पारा २४ तासांमध्ये २.३ अंशांनी चढला, तर सांताक्रूझ येथे १.३ अंशांनी मंगळवारपेक्षा बुधवारचे तापमान अधिक नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवर आर्द्रता […]