मुंबई : मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. कारण मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन पावसामुळे विस्कळीत झाली. परिणामी दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र साडेसात वाजल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. सीएसएमटी ते ठाणे या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील भांडुप-विक्रोळी, तर हार्बर […]