प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेमुळे सलग तिसऱ्या दिवशी लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. बुधवारीही दिवसभर लोकल विलंबाने धावत असल्याने मुंबईकरांची फरफट झाली.सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १०/११वरून २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. ब्लॉकनंतर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित झाली खरी, मात्र नव्या यंत्रणेमुळे लोकलसेवेचे वेळापत्रक […]