मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुती विधानसभेच्या तयारीला लागली आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पातून अनेक योजना जाहीर केल्या. यापैकी सर्वाधिक चर्चा झाली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची. त्यानंतर कालपासून लाडका भाऊ योजनेची चर्चा आहे. लोकसभेला संविधान, पक्षफूट, आरक्षण अशा विविध गोष्टींचा फटका महायुतीला बसला. आता विधानसभेला सामोरं जाताना महायुतीनं कल्याणकारी योजनांवर भर दिला आहे. […]