प्रतिनिधी, पुणे : बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना मोठ्या सोसायट्यांना बंधनकारक असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्रत्यक्षात कार्यान्वित आहेत का, सोसायट्यांकडून या प्रकल्पांचे व्यवस्थापन कसे केले जाते, यावर महापालिकेबरोबरच आता ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चीही (एमपीसीबी) नजर राहणार आहे. शहरातील पाण्याची मागणी वाढत असतानाच अनेक सोसायट्यांमध्ये सुरू असणाऱ्या पाण्याच्या अतिवापराच्या धर्तीवर ‘एमपीसीबी’ने हा निर्णय घेतला आहे. सांडपाण्याचा […]