Posted inपुणे

Pune Crime : बारामतीत पोलिसांचा दरोडेखोरांवर अंकुश, ‘मकोका’अंतर्गत कारवाई करत २३७ आरोपींना बेड्या

संतराम घुमटकर, बारामती : बारामती उपविभागात गेल्या तीन वर्षांत ३० दरोड्यांचा तपास करून २३७ आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. बारामती, इंदापूर या तालुक्यांतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस प्रशासन प्रयत्नशील असले, तरी वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत. पत्नी-पत्नीचे भांडण, भाऊबंदकीतून वाद या माध्यमांतून गुन्हेगारी डोके वर काढत आहे.ऐन उन्हाळ्यात दरोडेखोर सक्रिय होतात. […]