Posted inमुंबई

Ajit Pawar: लोकसभेत राष्ट्रवादी घायाळ; अजित पवारांची चिंता वाढली, ‘त्या’ बैठकीला काही आमदारांची दांडी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीची प्रचंड पिछेहाट झाली. गेल्या निवडणुकीत ४१ जागा जिंकणाऱ्या एनडीएला यंदा फक्त १७ जागा मिळाल्या. महायुतीच्या प्रचाराची, निवडणुकीची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. राज्यात महायुतीनं सपाटून मार खाल्ल्यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला. काल त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. पक्षानं राजीनामा घ्यावा, […]