प्रतिनिधी, मुंबई : दहिसरला मिरागावशी जोडणाऱ्या मेट्रो-९ उन्नत मार्गिकेच्या कारशेड (गाड्या दुरुस्ती डेपो) उभारणीची तयारी पुढील टप्प्यात गेली आहे. ६२६ कोटी रुपयांच्या या कारशेडच्या उभारणीसाठी तीन कंपन्यांनी निविदा भरली आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात निविदा काढण्यात आली होती.मेट्रो-९ ही मेट्रो-७ (गुंदवली-दहिसर) व मेट्रो-२अ (अंधेरी पश्चिम-आनंदनगर, दहिसर) यांना मिरा-भाईंदरशी जोडणारी १३.५८ किमी लांबीची दहा स्थानकांची उन्नत मार्गिका […]