Posted inमुंबई

Mumbai Local: जायचे गोरेगावला, सिग्नल वाशीचा; गार्डच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली, काय घडलं?

प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील (सीएसएमटी) मुख्य मार्गावरील लोकल खोळंब्याचे सत्र कायम असून, शनिवारी यात हार्बर मार्गावरील लोकलघोळाचीही भर पडली. सीएसएमटीहून गोरेगावला जाणाऱ्या लोकलला वाशीच्या दिशेचा सिग्नल देण्यात आला. विशेष म्हणजे, ही बाब मोटरमनच्या लक्षात न आल्याने लोकल वाशीच्या दिशेने निघाली. परंतु, गार्डने प्रसंगावधान दाखवत काही मीटरवरच गाडी थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. […]