Posted inमुंबई

कोस्टल रोडचा दुसरा टप्पा उद्यापासून सेवेत, अशी असेल वेगमर्यादा; यांना प्रवेशबंदी

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा देणाऱ्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे काम पूर्ण होण्यास अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. मात्र या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आज, सोमवारी १० जून रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवार, ११ जूनपासून हा दुसरा टप्पा, म्हणजेच मरिन ड्राइव्हपासून हाजीअली, लोटसपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. […]