मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबईतील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे. मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना आज, १ मेपासून मालमत्ता कराइतक्या रकमेचा दंड ठोठावण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतेच दिले. या कारवाईच्या भीतीपोटी गेल्या १५ दिवसांत ६२५ दुकाने आणि आस्थापनांनी मराठी […]