प्रतिनिधी, पुणे : जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अकोलेसह लगतच्या भागात सातत्याने बिबट्यांकडून होणारे हल्ले आणि चिघळलेला मनुष्य-बिबट्या संघर्ष लक्षात घेता वन विभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पिंजरे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या विस्तारासाठी वन विभागाने जलसंपदा विभागाकडून दहा एकर जागा विकत घेतली असून, या जागेत नवीन साठ पिंजरे बांधण्यात येणार आहेत.पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. […]