मुंबई : मालाड पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी मालाड मार्वे मार्गावरील ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम २७ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून २८ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामामुळे या दिवशी २४ तासांच्या कालावधीत मालाड/पी उत्तर, कांदिवली/आर दक्षिण व बोरिवली/ आर मध्य विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. […]