मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज होत असलेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव अटळ आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी मोठी खबरदारी घेतली आहे. काँग्रेसच्या बैठकीला चौघा आमदारांची अनुपस्थिती होती. त्यापैकी संजय जगताप आणि यशोमती ठाकूर यांची कळवून गैरहजेरी होती, तर अशोक चव्हाण समर्थक जितेश अंतापूरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवासी […]