प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषद निवडणुकीत आपापले उमेदवार निवडून आणताना आपले आमदार फुटू नयेत, दुसऱ्या पक्षांच्या गळाला लागू नयेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बुधवारी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलच्या चिरेबंदी वाड्यात मुक्कामाला ठेवले असले तरी त्यांच्या या वाड्याला भेगा पडणे फारसे अशक्य नाही. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने हे सर्व आमदार गुरूवारी दिवसभर विधिमंडळात कामकाजानिमित्त असल्याने […]