मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, त्यामुळे ठाकरे-पवारांना मिळत असलेली सहानुभूती त्याचवेळी १० वर्षांतली सत्ताधाऱ्यांविरोधातील काहीशी नाराजी, अशा सगळ्या मुद्द्यांभोवती महाराष्ट्रातील ४८ जागांवर झालेली लोकसभेची निवडणूक फिरली. दोन पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नव्याने समीकरणे तयार झाली. जागा वाटपातही दोन्हीकडे काहीसा गोंधळ उडाला. महायुतीचा भाग असलेल्या भाजपने २८, शिवसेना शिंदे गटाने १५ […]