प्रतिनिधी उद्योग आणि आर्थिक गुंतवणुकीत महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातने दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला मागे टाकल्याची धक्कादायक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. २०२२-२३ मध्ये दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानी असलेले महाराष्ट्र राज्य या स्थानावरून घसरत सहाव्या स्थानावर फेकले गेले असून गुजरातने दरडोई उत्पन्नात पहिल्या पाचमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात […]