मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मलेरिया, डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची तीनशेपेक्षा अधिक उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत. तसेच मलेरिया व डेंग्यू परसवण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या पाच हजारपेक्षा जास्त आस्थापनांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. […]