मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत गेलेल्या रविंद्र वायकरांना आता मुंबई पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीन चिट दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेले. पक्षांतर करा, अन्यथा तुरुंगात जा, असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते, असं वायकरांनी महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं […]