प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी आरोपी विशाल अगरवाल याला शुक्रवारी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. अपघाताच्या घटनेपूर्वी या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी ‘कोझी’ व ‘ब्लॅक’ या पबच्या मालक, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांचीही जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, विशाल अगरवालचा जामीन झाला असला, तरी चालकाला […]