Posted inमुंबई

आठवले महायुतीतून बाहेर पडणार? तिसऱ्या आघाडीसाठी हालचाली; ‘त्या’ बैठकीनं चर्चांना उधाण

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महायुती आणि महाविकास आघाडीनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेला राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. त्यात महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. पण आता विधानसभेला तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षांनी एकसंध आघाडी तयार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु केले आहेत. आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या […]