प्रतिनिधी, पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.‘अलायन्झ ग्लोबल इन्व्हेस्टर्स’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, संबंधित कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येते,’ अशी बतावणी चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या मोबाइलवर मेसेजद्वारे केली. त्यानंतर, महिलेला चोरट्यांनी […]