प्रतिनिधी, पुणे : महापालिका प्रशासनाने गुरुवारी शहराच्या विविध भागांतील नऊ बेकायदा होर्डिंगवर कारवाई करून ती पाडली. धोकादायक असलेल्या ७२ फलकांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती परवाना व आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. कोथरूड, वारजे आणि वानवडी या परिसरांत सर्वाधिक कारवाई करण्यात आली.मुंबई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३४९ होर्डिंगचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (संरचनात्मक लेखापरीक्षण) करण्यात आले […]