मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये १८ पदके, अशी कामगिरी असूनही सरकारी नोकरीची प्रतीक्षा संपतच नसल्याचे पाहून उदरनिर्वाहासाठी चहाची टपरी टाकणे भाग पडलेल्या पॅरालिम्पिकपटूला अखेर महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने आधार दिला आहे. सुधारित धोरण आखण्याबाबत होत असलेला लालफितीचा कारभार पाहून आयोगाने पॅरालिम्पिकपटू संदीप गवई यांना तात्पुरता आर्थिक आधार […]