प्रतिनिधी, पुणे : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला गेला. उन्हाच्या झळांमुळे सकाळपासूनच हैराण झालेल्या नागरिकांना वाढलेल्या तापमानाने घाम फोडला. उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरला ‘यलो अॅलर्ट’चा इशारा दिला आहे. दरम्यान तळेगाव ढमढेरे येथे ४४, तर शिरूर येथे ४३.९ […]