म.टा.खास प्रतिनिधी, मुंबईराज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बहुप्रतिक्षित सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर केली जाण्याची चिन्हे आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे मुख्य सचिवांसोबत बैठक पार पडली असून अंतिम निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर […]