मुंबई : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा, असे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अनधिकृत होर्डिंग दिसल्यास ते काढून टाकण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका मुख्यालयातील बैठकीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.सध्या मुंबई […]