म. टा. वृत्तसेवा, सांगली : गर्भलिंग परीक्षणानंतर कर्नाटकात गर्भपात करताना एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तिचे नातेवाइक सांगली शहरात मोटारीत मृतदेह घेऊन फिरत होते. पोलिसांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी बस स्थानक परिसरात सोमवारी सायंकाळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. संबंधित महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. काय आहे […]